आजपासून राज्यभरातील विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालये 11 महिन्यानंतर गजबजणार; मुंबई अपवाद

आजपासून राज्यभरातील विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालये 11 महिन्यानंतर गजबजणार; मुंबई अपवाद

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर उद्या तब्बल 11 महिन्यानंतर विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालय सुरू होणार आहेत. यामुळे राज्यात मुंबई आणि परिसराचा अपवाद वगळता विद्यापीठ, महाविद्यालये विद्यार्थी शिक्षकांच्या उपस्थितीमुळे गजबजलेले दिसणार आहेत.
राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 3 फेब्रुवारी रोजी घोषणा केली होती.

कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात महविद्यालये बंद राहतील तर राज्यातील उर्वरित सर्वच जिल्ह्यांमधील वरिष्ठ महाविद्यालय, विद्यापीठे यांचा कारभार हा आज (सोमवार 15 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. 

प्रत्येक महाविद्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवली जाणार असून स्थानिक स्तरावर धोरणाचा आढावा घेऊन ही उपस्थिती वाढविण्याची अधिकार संबंधित विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मुंबई आणि परिसरात शाळा कनिष्ठ महाविद्यालय विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालय अध्यापक बंदच राहणार आहेत. यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तर मुंबई आणि परिसरातील शाळा तील ऑनलाईन शिकवण्या मात्र सुरू राहतील, मात्र त्या कुठेही प्रत्यक्षात सुरू केल्या जाणार नाहीत. अशी माहिती महापालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली.

राज्यातील विद्यापीठ आणि सर्व महाविद्यालय सुरू करताना यामध्ये पहिल्या टप्प्यात 5 मार्चपर्यंत 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवता येईल. विद्यार्थ्यांना रोटेशन प्रमाणे बोलावता येईल. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये यादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे घेतल्या जातील. तशी मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. उपस्थिती संदर्भात विद्यापीठे आणि स्थानिक प्रशासनाच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठांना आणि शिक्षण विभागाला असतील.

याबाबत बोलताना बुक् टोचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे म्हणालेत की, "विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने अनेक परवानग्या घेऊन तशी माहिती महाविद्यालयांना कळवण्यास विलंब केला आहे. कोरोनासंदर्भात खबरदारी घेताना लागणाऱ्या यंत्रणे चा खर्च,  यासाठी विद्यापीठाने कोणतीही जबाबदारी उचलली नाही, त्यामध्ये लवकरच स्पष्टता येणे आवश्यक आहे. शिवाय मुंबई परिसरात आढावा घेऊन येथील महाविद्यालये सुरू करण्यासाठी कार्यवाही लवकर केली जावी. "

तर शिक्षक भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे म्हणालेत, मुंबई आणि परिसरात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू केली जावीत, अशी आम्ही मागणी स्थानिक प्रशासनाकडे करत आहोत. एकूणच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन किमान काही विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवून शाळा सुरू केल्या जाव्यात.  त्या सुरू झाल्या तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्‍न सोडविणे यामुळे शक्य होईल. 

colleges and senior colleges from maharashtra to start after 11 months mumbai and mmr is exception

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com