शेतकऱ्यांसाठी ‘कम्युनिटी रेडिओ’ - पाशा पटेल

Pasha-Patel
Pasha-Patel

औरंगाबाद - सर्वसामान्य शेतकऱ्यांना हवामानातील बदल आणि त्यावर आधारित शेतीसंबंधी मार्गदर्शन मिळावे यासाठी आयोगातर्फे ‘क्‍लायमेंट चेंज ॲण्ड ॲग्रिकल्चर’ (हवामानातील बदल आणि शेती) या विषयावर कम्युनिटी रेडिओ सुरू होणार आहे. येत्या महिनाभरात हा रेडिओ सुरू होणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ‘सकाळ’ला दिली.

दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडून गेले आहे. ही परिस्थिती का उद्‌भवली, यावर उपाय काय, याचे संशोधन राज्य कृषी मूल्य आयोगातर्फे केले जात आहे.  

पाशा पटेल म्हणाले, की हवामानातील बदलाविषयी आमचा अभ्यास सुरू आहे. पूर्वी आपल्याकडे २७ नक्षत्रे होती. 

आता दोनच नक्षत्रे उरली आहेत. एक ढगफुटी आणि दुसरे दुष्काळ! दोन्ही ‘नक्षत्रां’मुळे शेतीचे कसे नुकसान होत आहे, त्यापासून पिके वाचविण्यासाठी काय करावे, याची माहिती या रेडिओतून दिली जाणार आहे. यासाठी आम्ही सर्व परवानगी घेतल्या आहेत.कदाचित हवामानातील बदल आणि शेती या विषयांवर माहिती देणारा देशातील पहिला कम्युनिटी रेडिओ असेल, असा दावाही पटेल यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com