Vidhan Sabha 2019: ईव्हीएम गोंधळाच्या  काँग्रेसकडे तक्रारी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

 विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानावेळी २३० मतदान केंद्रांवर ईव्हीएममुळे काही काळ अडथळे आल्याच्या घटना घडल्या. काँग्रेसने या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याने प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात ‘वॉर रूम’ तयार ठेवली होती. आज दिवसभरात २३० ठिकाणांहून ईव्हीएमबाबत ‘वॉर रूम’कडे तक्रारी प्राप्त झाल्या.

विधानसभा 2019 
मुंबई - विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानावेळी २३० मतदान केंद्रांवर ईव्हीएममुळे काही काळ अडथळे आल्याच्या घटना घडल्या. काँग्रेसने या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याने प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात ‘वॉर रूम’ तयार ठेवली होती. आज दिवसभरात २३० ठिकाणांहून ईव्हीएमबाबत ‘वॉर रूम’कडे तक्रारी प्राप्त झाल्या. काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक अविनाश पांडे यांनी या सर्व तक्रारी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवून तातडीने दखल घेण्याची विनंती केली.

या २३० पैकी काही ठिकाणी ईव्हीएम मशिन अचानक बंद पडणे, मतदान करताना अडथळे येणे, अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. तर, काही ठिकाणी व्हीव्हीपॅट व मशिनचा संपर्क तुटण्याच्याही घटना घडल्या. काँग्रेसच्या बूथ प्रतिनिधींनी याबाबतची सर्व माहिती पक्षाच्या मुख्यालयाकडे कळवून दक्षता घेण्याची विनंती केली. नागपूर विभागातून सर्वाधिक तक्रारी आल्याचे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints to Congress of EVM Confusion