राज्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रलंबित मागण्यांसाठी विविध कामगार व शेतकरी संघटना, सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारला होता. यानिमित्त अनेक ठिकाणी आंदोलन, ‘रास्ता रोको’ करण्यात आले. काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या; तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या आंदोलनात भाग घेतला.

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रलंबित मागण्यांसाठी विविध कामगार व शेतकरी संघटना, सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारला होता. यानिमित्त अनेक ठिकाणी आंदोलन, ‘रास्ता रोको’ करण्यात आले. काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या; तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या आंदोलनात भाग घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई
    पंजाब नॅशनल बॅंक कामगार संघटना संयुक्त कृती समितीने मोर्चा काढला. 
    सीएसटीएम येथील टपाल कार्यालयामध्ये तुरळक गर्दी 

पश्‍चिम महाराष्ट्र
    पुण्यात भारत ‘बंद’ला पाठिंबा देत शासकीय कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
    कोल्हापुरात ‘बंद’ला प्रतिसाद; मोर्चाचे आयोजन
    गडहिंग्लज, भोगावती, चंदगड, जयसिंगपूरमध्ये ‘रास्ता रोको’
    सांगलीत ‘रास्ता रोको’
    रत्नागिरी जिल्ह्यात सर्व सरकारी कर्मचारी संपात सहभागी
    संपाला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद
    जेल भरो आंदोलनात दोन हजार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
    साताऱ्यात विविध संघटनांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद; तसेच वीज वितरण, टपाल कार्यालयासमोर मोर्चे काढले
    सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, पंचायत समिती; तसेच इतर शासकीय कार्यालये ओस पडली होती.

विदर्भ
    स्टेट बॅंक वगळता इतर बॅंकांचे व्यवहार ठप्प

मराठवाडा
    औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तालयावर मोर्चा 
    घाटी रुग्णालयाचे कामकाज ठप्प
    ‘एसबीआय’वगळता अन्य बॅंकांतील व्यवहार ठप्प


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Composite response to the bandh in the state