संगणक परिचालकांना सहा हजार रुपये मानधन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

मुंबई - राज्यातील 27 हजार संगणक परिचालकांना अखेर न्याय मिळाला आहे. संघटनेने केलेली आंदोलने आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिचालक संघटनेच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

मुंबई - राज्यातील 27 हजार संगणक परिचालकांना अखेर न्याय मिळाला आहे. संघटनेने केलेली आंदोलने आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिचालक संघटनेच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 27 हजार संगणक परिचालक "संग्राम‘ प्रकल्पाअंतर्गत काम करत होते. राज्य सरकारने हा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी बंद केल्यामुळे 27 हजार संगणक परिचालक बेरोजगार झाले. त्यांच्या मागण्यांसाठी संघटना सातत्याने आंदोलने करत होती. या आंदोलनाला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दर्शवून सभागृहात वेळोवेळी सरकारला धारेवर धरले. गेल्या वर्षी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संघटनेच्या मोर्चात ते सहभागी झाले होते. सोमवारी (ता. 25) विधानभवनावर आलेल्या मोर्चामुळे हा विषय पुन्हा मुंडे यांनी विधान परिषदेत लावून धरला आणि संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य करा, अशी आग्रही मागणी केली होती. 

या पार्श्‍वभूमीवर ग्रामविकास विभागाने सोमवारी सभागृहात निवेदन सादर केले. संगणक परिचालकांचे मानधन चार हजार 500 वरून सहा हजार रुपये करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्या कमिशनमध्येही वाढ होणार आहे. 

Web Title: computer operator paid Rs six thousand