Nitesh Rane : आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा

सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीतून या प्रकरणाची सत्यता बाहेर येईल. दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
Aditya Thackeray vs Nitesh Rane
Aditya Thackeray vs Nitesh Raneesakal

‘दिशा सालियान प्रकरणात ‘एसआयटी’ गठित करून तपासासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी माजी मंत्री आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करून त्यांचा पासपोर्ट जप्त करावा,’ अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.

सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीतून या प्रकरणाची सत्यता बाहेर येईल. दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आपला मुलगा आरोपी असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा बचाव करीत असल्याचे ते म्हणाले.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपपत्र देण्यास विरोध आहे. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच ते देण्यात यावे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या मोर्चावर झालेला लाठीमार नियोजित होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com