Vijay Wadettiwar: राणेंसोबत शिवसेना फोडली ते आज विरोधी पक्षनेतेपद; असा आहे वडेट्टीवारांचा राजकीय प्रवास

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद नाना पटोले यांच्याकडे आहे आणि आता विरोधी पक्षनेते पद वडेट्टीवार यांना देण्यात आले आहे. दोन्ही नेते विदर्भातीलच आहेत. यानिमित्ताने वडेट्टीवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal

मुंबई- विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची आज निवड होण्याची शक्यता आहे. विधान भवनाच्या कामकाजादरम्यान त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. विधानसभा निवडणुका साधारण एका वर्षावर आणि लोकसभेच्या निवडणुका आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात चांगले मत मिळाले होते. त्यामुळे विदर्भातील नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद नाना पटोले यांच्याकडे आहे आणि आता विरोधी पक्षनेते पद वडेट्टीवार यांना देण्यात आले आहे. दोन्ही नेते विदर्भातीलच आहेत. यानिमित्ताने वडेट्टीवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया.

1962 साली चंद्रपुरातील गोंडपंपरी तालुक्यातील करंजी येथे जन्मलेले वडेट्टीवार यांनी कॉलेजमध्ये असतानाच राजकीय क्षेत्रात पाय ठेवला होता. सर्वात आधी ते एनएयुआयच्या माध्यमातून विद्यार्थी आंदोलनाच सहभागी झाले. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वडेट्टीवार यांचा राजकारणात येण्याचा निर्णय धाडसी होता. सुरुवातीला त्यांनी काँग्रेसमधून सुरुवात केली असली तरी त्यांनी नंतर शिवसेनेत जाऊन चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यात आंदोलने केली.

1991 ते 1993 या काळात ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे नामनियुक्त सदस्य होते. शिवसेना- भाजप युतीच्या सरकारमध्ये त्यांना महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. या पदाला राज्यमंत्री दर्जा होता. 1998 साली शिवसेनेने त्यांना विधानपरिषद आमदारकीची संधी दिली. त्यानंतर 2004 साली त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. याच काळात तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांनी बंड केलं. राणे यांना पाठिंबा असणाऱ्या 11 आमदारांमध्ये वडेट्टीवार यांचाही समावेश होता. पुढे राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना महसूलमंत्री करण्यात आलं.

2008 साली वडेट्टीवारांना राज्यमंत्री करण्यात आलं. त्यांना जलसंपदा, आदिवासी विकास आणि पर्यावरण वने या खात्याचा भार देण्यात आला. त्यांना हे पद केवळ एक वर्षच उपभोक्ता आलं, पुढे ते पुन्हा एकदा चिमूर मतदारसंघातून निवडून आले. त्यांना 2009 मध्ये जलसंपदा, उर्जा, वित्त व नियोजन आणि संदकीय कार्य या खात्याचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं.

2014 साली काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. वडेट्टीवारांनी या काळात काँग्रेसची साथ सोडली नाही. विधानसभेत त्यांच्याकडे उपनेतेपद होतं. पुढे राधाकृष्ट विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं. वडेट्टीवार यांना रिक्त पदावर संधी देण्यात आली. आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून त्यांना विरोधी पक्षनेते पदावर बसवण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com