राष्ट्रवादी भाजपला मदत करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जून 2019

राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी आज (ता.07) केला आहे. काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवला आहे. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी मतदारसंघात काँग्रेसला मदत न करता भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, त्याऐवजी वंचित बहुजनसोबत आघाडी करावी, असा सूर बैठकीत उमटला.

मुंबई: राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी आज (ता.07) केला आहे. काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवला आहे. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी मतदारसंघात काँग्रेसला मदत न करता भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, त्याऐवजी वंचित बहुजनसोबत आघाडी करावी, असा सूर बैठकीत उमटला.

एकीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना हा आरोप करणं हे धक्कादायक आहे. या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसने निवडणूक स्वबळावर लढावी असा ठरावही मांडण्यात आला. मात्र त्याबाबत चर्चा करून ठरवू वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना आम्ही सोबत घेण्यासंबंधी विचार करतो आहोत. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही करू मात्र अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे असे या बैठकीत अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजपतले इतर नेते करत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आणि नगरमधून ते भाजपच्या तिकिटावर खासदारही झाले. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील भाजपत जाणार हे नक्की झाले आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशोक चव्हाणांना भाजपत येण्यासाठी फोन करत आहेत असा आरोप अशोक चव्हाण यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress accused NCP that they are supporting BJP