काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षे सत्तेचा विचार करू नये : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

युती सरकारने गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या विविध विकासकामांमुळे जनतेमध्ये भाजपाविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच अन्य पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी केले होते. 

मुंबई : आगामी पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार नाही, असे भाकीत भाजपचे प्रदेशाअध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

युती सरकारने गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या विविध विकासकामांमुळे जनतेमध्ये भाजपाविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच अन्य पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी केले होते. 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र 34 लाख हेक्टरवरून वाढून 40 लाख हेक्टर झाले. सिंचनाप्रमाणेच विविध क्षेत्रात विकास झाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. परिणामी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना भाजपामध्ये प्रवेश करावा असे वाटते. आगामी पंधरा वर्षे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार नाही. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी नेत्यांना भाजपासोबत यावेसे वाटते. भाजपामध्ये घाणेरडे राजकारण होत नाही, याची अन्य पक्षातील नेत्यांना जाणीव झाली आहे.

त्यांनी सांगितले की, माजी केंद्रीय मंत्री व माजी राज्यपाल राम नाईक पुन्हा राजकारणात सक्रीय होत असून मंगळवारी भाजपचे सदस्यत्व पुन्हा स्वीकारणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and NCP not power next 15 years says Chandrakant Patil