Ashok Chavan : पाळत ठेवली जातेय, घातपाताचा प्रयत्न होतोय; चव्हाणांचा गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ashok chavan
Ashok Chavan : पाळत ठेवली जातेय, घातपाताचा प्रयत्न होतोय; चव्हाणांचा गंभीर आरोप

Ashok Chavan : पाळत ठेवली जातेय, घातपाताचा प्रयत्न होतोय; चव्हाणांचा गंभीर आरोप

आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसंच घातपाताचा प्रयत्नही केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसंच आपल्या मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रं तयार केल्याची तक्रारही त्यांनी पोलिसांत दाखल केली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळातली काही शासकीय पत्रं मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यावरचा मूळ मजकूर मिटवला आणि सही तशीच ठेवून कोरं लेटरहेड तयार केलं. काही दिवसांपूर्वीच चव्हाण यांना असं लेटरहेड सापडल्याने त्यांनी या आधीच पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हापासून याचा तपासही सुरू होता.

पण, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं एक खोटं पत्र मिळाल्यानं चव्हाण यांनी तातडीने नांदेडच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली तक्रार दाखल केली आहे. तसंचआगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन करण्यासाठी आणि जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

पुढील काळात अशाच प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता दिसून येते. तसंच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्नही होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.