काँग्रेस शहराध्यक्ष म्हणाले... भाजपात गेल्यावर ‘ईडी’ची कारवाई होत नाही!

विरोधी पक्षातील नेत्यांवर भाजपच्याच नेत्यांनी आरोप केले आणि त्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांची चौकशी होत नाही. म्हणजे ‘भ्रष्टाचाराला भाजपची हरकत नाही, फक्त तो नेता भाजपात असायला हवा’ अशी दुटप्पी भूमिका मोदी सरकारची असल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी यावेळी केला.
congress strike
congress strikesakal

सोलापूर : मोदी सरकारची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरील नॅशनल हेराल्ड प्रकरणातील ‘ईडी’ची कारवाई भ्रष्टाचाराविरोधात नाही, तर भाजप विरोधकांच्या विरोधात असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावलेले आहे. त्याच्या निषेधार्थ आणि मोदी सरकारची चुकीची धोरणे आणि हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात मंगळवारी (ता. २६) काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलने करण्यात आली. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष वाले यांच्या नेतृत्वात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (पूनम गेट) धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा निषेधदेखील करण्यात आला. यावेळी माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, ॲड. मनीष गडदे, नरसिंग आसादे, किसन मेकाले, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, शिवा बाटलीवाला, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, अनुराधा काटकर, माजी महापौर आरिफ शेख, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, पंडित सातपुते, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष शालिवाहन माने देशमुख, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, प्रवीण जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, नागनाथ कदम, राजन कामत, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, शुभांगी लिंगराज, वीणा देवकते, अनिता भालेराव, अरुणा बेजांरपे, लता सोनकांबळे, प्राजक्ता घाटे, चंदा काळे, स्नेहल शिंदे, पदमा मटला, जकीया पठाण, मीना गायकवाड, मल्लिकार्जुन बिज्जरगी, बाबासाहेब गायकवाड, तेजस चव्हाण, शकूर शेख आदी उपस्थित होते.

भाजपात प्रवेश केल्यावर थांबते कारवाई

स्वतःच्या चुकीच्या धोरणांवर पांघरुण घालण्यासाठी मोदी सरकारकडून काँग्रेस नेत्यांवर दबाब टाकला जातोय. सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये ‘नॅशनल हेराल्ड’ची फाईल बंद केलेली असतानाही मोदी सरकार आता त्याची चौकशी करत आहे. ‘ईडी’च्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व नेते राहुल गांधींची चौकशी करून त्यांची नाहक बदनामी केली जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर भाजपच्याच नेत्यांनी आरोप केले आणि त्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांची चौकशी होत नाही. म्हणजे ‘भ्रष्टाचाराला भाजपची हरकत नाही, फक्त तो नेता भाजपात असायला हवा’ अशी दुटप्पी भूमिका मोदी सरकारची असल्याचा आरोप वाले यांनी यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com