
नागपूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्साह आहे. राजकीय लोकांकडून जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यातच लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी शिवरायांना अभिवादन करणारी एक पोस्ट ट्विटरवर पोस्ट केली. पण यामध्ये एक चूक झाल्याचं सांगत भाजपनं त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पण आता राहुल गांधींच्या या ट्विटबाबत काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलं आहे.