Pankaja Munde : 'भाजपचे संस्कार...', म्हणत काँग्रेसने शेअर केला पंकजा मुंडेंचा 'तो' व्हिडिओ

'महाराष्ट्र काँग्रेस'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडीओ केला पोस्ट
Pankaja Munde
Pankaja MundeEsakal

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या कार्यक्रमाला पंकडा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे दोघी बहिणी गैरहजर होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या. काल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे मी बोलते म्हणत असताना बावणकुळे त्यांना नाही म्हणतात त्यानंतर त्या जाऊन आपल्या जागेवर बसतात असा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पंकजा मुंडे यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांना डावललं जात असल्याचं बोललं जात आहे. त्यातच भर म्हणजे आता 'महाराष्ट्र काँग्रेस'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्या आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना बोलू देण्याची विनंती केली, मात्र, बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्या आधी बोलू दिलं नाही. या व्हिडिओवरून भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यात येत आहे.

Pankaja Munde
Pune : छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर'च; अजितदादांच्या वक्तव्याचा शिवेंद्रराजेंनी घेतला समाचार

हा व्हिडीओ पोस्ट करताना काँग्रेसने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 'जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपचे संस्कार म्हंटल्यावर असच होणार!' अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

Pankaja Munde
Elon Musk...तर ट्विटरसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे; इलॉन मस्क यांचं ट्विट

गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण पक्षावर नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी जन्मापासूनच भाजपची कार्यकर्ता आहे. मुंडेसाहेब आणि भाजपला वेगळं करता येणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिली होती.

Pankaja Munde
Prakash Ambedkar: कहानी में ट्विस्ट! वंचित पदवीधर-शिक्षक मतदार संघाच्या चार जागा लढवणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com