esakal | दिल्लीत झालेल्या बैठकीचे काँग्रेसने दिले नाही शिवसेनेला आमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-shivsena

राज्यात महाविकास आघाडीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेने हातमिळवणी केली असली, तरी शिवसेनेच्या धर्मनिरपेक्ष भूमिकांविषयी काँग्रेसला अद्यापही पुरेशी खात्री वाटत नाही. काँग्रेसने सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी आमंत्रित केले असले, तरी शिवसेनेच्या भूमिकेविषयी काँग्रेसला अंदाज येत नसल्याने विरोधकांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीपासून शिवसेनेला दूर ठेवण्यात आले.

दिल्लीत झालेल्या बैठकीचे काँग्रेसने दिले नाही शिवसेनेला आमंत्रण

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेने हातमिळवणी केली असली, तरी शिवसेनेच्या धर्मनिरपेक्ष भूमिकांविषयी काँग्रेसला अद्यापही पुरेशी खात्री वाटत नाही. काँग्रेसने सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी आमंत्रित केले असले, तरी शिवसेनेच्या भूमिकेविषयी काँग्रेसला अंदाज येत नसल्याने विरोधकांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीपासून शिवसेनेला दूर ठेवण्यात आले. शिवसेनेनेही याविषयी सावध भूमिका घेत या बैठकीबाबत गैरसमज झाल्याची सारवासारव शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करण्यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून शिवसेना बाहेर पडली. केंद्र सरकारमध्ये असलेल्या कॅबिनेट मंत्रिपदाचाही शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. सीएएचे विधेयक लोकसभेत मंजूर करताना शिवसेनेने पाठिंबा दिला, तर राज्यसभेत मतदानात भाग न घेता सभात्याग केला. शिवाय, काँग्रेसप्रणीत सर्व राज्ये, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांनी सीएए कायद्याची त्यांच्या राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, महाराष्ट्राने अद्याप याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्यानेही शिवसेनेच्या भूमिकेविषयी काँग्रेसला विश्‍वास वाटत नसल्यानेही शिवसेनेला या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. केंद्रात विरोधी पक्षात शिवसेना असली, तरी अद्याप शिवसेनेला संयुक्‍त पुरोगामी आघाडीत घेण्याविषयी आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. 

त्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही - देवेंद्र फडणवीस

याबाबत शिवसेनेेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यात हा कायदा जबरदस्तीने लादला जाणार नाही, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. या सीएए कायद्याबाबत काही त्रुटी आहेत असे शिवसेनेला वाटते. त्या दूर व्हायला पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी करीत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचे 
सांगितले. 

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?