esakal | त्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही - देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

That book has no any BJP relation says Devendra Fadnavis
  • त्या पुस्तकाचा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही - देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या ज्या पुस्तकावरून वादळ सुरू आहे, त्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. लेखकांनी सुद्धा ते पुस्तक परत घेण्याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळे त्यावरून भाजपवर टीका करणे योग्य नाही. आपल्या लिखाणातून काय अर्थ निघू शकतात, याचा विचार करूनच प्रत्येकाने लेखन केले पाहिजे, असे त्यांचे मत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस म्हणले 'छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील एक भक्कम, मजबुत नेतृत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्त्वात भारताचा लौकिक संपूर्ण जगात वाढत आहे'.

भाजपची सत्ता असलेल्या या राज्यात तान्हाजी टॅक्स फ्री? महाराष्ट्रात कधी?

2014 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आर्शीवाद घेऊनच केला होता आणि शिवछत्रपतींच्याच मार्गाने आपली वाटचाल असेल, असे स्पष्ट केले होते. त्यांना शिवछत्रपतींच्या मार्गावर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकत नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात काल (ता.१२) 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यानंतर मोठा वादही झाला. भाजपनेते जय भगनवान गोयल यांनी हे पुस्तक लिहले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.

loading image