
Balasaheb Thorat : थोरातांच्या राजीनाम्यानंतर हायकमांड अॅक्टिव्ह मोडमध्ये; प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Congress High Command Active After Balasaheb Thorat Resignation Nana Patole )
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन थोरातांची समजूत काढणार असल्याची समोर आली आहे. तसेच, अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवण्यात आले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Congress: नाना पटोलेंना राहुल गांधींचा फोन; भारत जोडोनंतर कॉंग्रेसमध्ये बदलले समीकरण?
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठं राजकारण रंगलं आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत थोरात यांची निष्क्रियता तसंच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घवडून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरात यांचं विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीत होतं.
बाळासाहेब थोरात यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून थोरात यांनी आपलं नाराजीचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलं होतं. पक्षात आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला होता.