esakal | महत्त्वाची बातमी : काँग्रेस-राष्ट्रवादीची रद्द झालेली बैठक आजच होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi

शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून सध्या काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. दिल्लीतील वरिष्ठ पाठिंबा देण्यास तयार नाहीत तर, राज्यातील नेतृत्व पाठिंब्यासाठी आग्रही असल्याचे समजते.

महत्त्वाची बातमी : काँग्रेस-राष्ट्रवादीची रद्द झालेली बैठक आजच होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच काल सुटण्याची शक्यता असताना काँग्रेसच्या अस्पष्ट भूमिकेमुळे शिवसेनेची सत्ता स्थापन होता होता राहिली. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून सध्या काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. दिल्लीतील वरिष्ठ पाठिंबा देण्यास तयार नाहीत तर, राज्यातील नेतृत्व पाठिंब्यासाठी आग्रही असल्याचे समजते. आता यावर काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हायकमांडने आपल्या निरीक्षकांना, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी मुंबईला पाठबविण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही माहिती दिली आहे. आज, सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांनंतर निरीक्षकांना मुंबईला पाठवा, असा निरोप काँग्रेस श्रेष्टींना दिला होता. पण, काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी आज, नेत्यांना मुंबईत पाठवून चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दुपारी चार नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. 

निरीक्षक कोण?
राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी रात्री साडे आठ पर्यंतची मुदत वेळ देण्यात आली आहे. तत्पूर्वी, आज, मुंबईत आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वतंत्र तसेच संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळूवन आघाडीचे सरकार स्थापन करायचे की, शिवसेनेला पाठिंबा जाहीर करायचा यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सध्या सत्ता स्थापनेचा केंद्र बिंदू पूर्णपणे सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे. काल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल 50 मिनिटे चर्चा केली. त्यावेळी अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, तसेच, संजय राऊतदेखील उपस्थित होते. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस हायकमांडने दिल्लीहून दोन निरीक्षक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, हायकमांड या निरीक्षकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार या संपूर्ण प्रक्रियेत हायकमांडशी चर्चा करत आहेत. दरम्यान, दिल्लीहून कोण दोन निरीक्षक येणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. 

राष्ट्रवादीचे कसब पणाला; राज्यात आज काय घडू शकते?

शिवसेनेची भूमिका कोण मांडणार?
गेले जवळपास 15-20 दिवस शिवसेना खासदार संजय राऊत पक्षाची भूमिका मांडत होते. मात्र, त्यांना काल लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून, अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका माध्यमांशी कोण मांडणार, हे अद्याप कळालेले नाही. शिवसेना नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी बैठकीची माहिती दिली होती.

पाऊस मुख्यमंत्री पाहून नाही, तर मुख्यमंत्री घेऊन गेला

loading image