राष्ट्रवादीचे कसब पणाला; राज्यात आज काय घडू शकते?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी मुदत देण्यात आली. पण, बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. 

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. काल (सोमवार, 11 नोव्हेंबर) रात्री राज्यपालांनी तिसऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केलं. राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी मुदत देण्यात आली. पण, बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. 

काय घडलं काय घडणार?

 1. काँग्रेसची भूमिका अजूनही गुलदस्त्यात, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून मतभेद
 2. शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधी तयार नाहीत, आमदारांशी चर्चा केल्यानंतरही भूमिका अस्पष्ट 
 3. काँग्रेसच्या नेत्यांची आज, पुन्हा बैठक
 4. काँग्रेस आमदार जयपूरहून मुंबईत येण्याची शक्यता
 5. राष्ट्रवादीशी पुन्हा चर्चा करूनच निर्णय घेऊ : मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते
 6. शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज, मुंबईत बैठक
 7. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी रात्री साडे आठपर्यंतचीच मुदत 
 8. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे अपुरे संख्याबळ 
 9. दोन्ही पक्षांच्या आमदारांची एकूण संख्या 99 
 10. काही अपक्षांचा पाठिंबा
 11. बहुमतासाठी लागणार 145 आमदरांचे संख्याबळ
 12. काँग्रेस-शिवसेनेच्या पाठिंब्यावर, राष्ट्रवादी स्वतः सरकार स्थापन करणार?
 13. सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगून, शिवसेनेला पाठिंबा देणार?

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यपालांची भूमिका निर्णायक
राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्षही सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्यामुळं राष्ट्रपती राजवटी शक्यता बळावली आहे, असं कायदे तज्ज्ञ सुभाष कष्यप यांनी व्यक्त केले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपाल भगतसिंग कोशियार यांची भूमिका निर्णायक आहे. त्यांना कलम 172नुसार वेळेची मर्यादा नाही. पंरतु, जर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादीही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरला तर, मग राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता जास्त असल्याचे मत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

'पाऊस मुख्यमंत्री पाहून नाही, तर मुख्यमंत्री घेऊन गेला'

युतीचा तीस वर्षांचा संसार मोडला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra political updates speculation what can happen