अनिल देशमुखांचं स्वागत जल्लोषात? राष्ट्रवादीच्या बाईक रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली Anil Deshmukh : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

Anil Deshmukh : अनिल देशमुखांचं स्वागत जल्लोषात? राष्ट्रवादीच्या बाईक रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणीत त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची आज सुटका होत आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे. पोलिसांच्या या पत्रानंतर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तर या बाईक रॅलीला मुंबई पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निलेश भोसले यांना नोटीस पाठवून मोटार सायकल रॅली काढू नये असे म्हंटले आहे. हे पत्र ट्विट करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष मेहबूब शेख यांनी ट्विट करत टीका केली आहे.

हेही वाचा: Sushant Singh Rajput: ते कोण होते असे म्हणत सुशांतच्या हत्याप्रकरणात अग्निहोत्रींचा मोठा धक्का

पत्रात पोलिसांनी काय म्हंटलं आहे?

ज्या अर्थी आपण दि. २८/१२/२०२२ रोजी विभागीय राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे आर्थर रोड कारागृह ते सिद्धी विनायक मंदिर अशी बाईक रॅली काढणार आहेत. सदर बाईक रॅलीमध्ये मोठया प्रमाणात लोक सामिल होणार असल्याने सदर परिसरात व बाईक रॅलीच्या मार्गावर आपल्या अशा कृतीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो तसेच सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.

हेही वाचा: Vasant More: "साहेब तुम्ही बसा, मी मागे...'' वसंत मोरेंच्या विधानाची रंगली चर्चा

त्याअर्थी, मी सुनिल चंद्रमोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे, मुंबई, मी फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ च्या कलम १४९ अन्वये प्राप्त अधिकारान्वये आपणांस नोटीस देतो की, आपणाकडुन असे कोणतेही कृत्य की, ज्याद्वारे दखलपात्र / अदखलपात्र गुन्हा तसेच सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य आपण किंवा आपल्या कार्यकर्तामार्फत करू नये. तसेच बाईक रॅली काढु नये.

जर असे कोणतेही कृत्य आपणांकडुन झाल्यास त्याबाबत आपण कायदेशीर कारवाईस पात्र राहाल व त्यानुरूप कायदेशीर कारवाई केली जाईल आणि सदर नोटीस पुरावा म्हणुन आपणांविरूदध मा. न्यायालयात सादर करण्यात येईल.