
काँग्रेस नेत्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबतच बैठक होणार असून सत्तास्थापनेबाबत आणि शिवसेनेला समर्थन देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के पी वेणुगोपाल हे मुंबईत पोहोचले असून ते विमानतळावरून निघाले आहेत. महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार नसीम खान यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले आहे. काँग्रेस नेत्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबतच बैठक होणार असून सत्तास्थापनेबाबत आणि शिवसेनेला समर्थन देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट; राज्यपालांकडून शिफारस
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता या बैठकीमुळे आहे. काल (ता.12) काँग्रेसच्या अस्पष्ट भूमिकेमुळे शिवसेनेची सत्ता स्थापन होता होता राहिली. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून सध्या काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. दिल्लीतील वरिष्ठ पाठिंबा देण्यास तयार नाहीत तर, राज्यातील नेतृत्व पाठिंब्यासाठी आग्रही असल्याचे समजते. आता यावर काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra: Congress leaders Mallikarjun Kharge, Ahmed Patel and KC Venugopal arrive in Mumbai, to meet National Congress Party Chief Sharad Pawar https://t.co/xcpXcRk96i pic.twitter.com/EMwzwDeYOw
— ANI (@ANI) November 12, 2019
हायकमांडने आपल्या निरीक्षकांना, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी मुंबईला पाठविले असून ते मुंबईत पोहोचले आहेत. आज (ता.12) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांनंतर निरीक्षकांना मुंबईला पाठवा, असा निरोप काँग्रेस श्रेष्टींना दिला होता. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी आज, नेत्यांना मुंबईत पाठवून चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, निरिक्षक हे शरद पवार यांच्याशी चर्चा करतील.