राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट; राज्यपालांकडून शिफारस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 November 2019

भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे याबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबतचे निवेदन देत घटनेनुसार राज्य चालविणे कठीण असल्याचे म्हटले आहे. राज्यातील कलम 356 लागू करण्याची स्थिती असल्याचेही राज्यापालांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करेपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होणाऱ हे निश्चित मानण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा गुंता सुटत नसल्याच दिसताच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे.

मी ठणठणीत त्याच आवेशाने परत येणार : संजय राऊत

भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे याबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबतचे निवेदन देत घटनेनुसार राज्य चालविणे कठीण असल्याचे म्हटले आहे. राज्यातील कलम 356 लागू करण्याची स्थिती असल्याचेही राज्यापालांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करेपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होणाऱ हे निश्चित मानण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे 'हे' असतील पर्याय

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांची मुदत रात्री साडे आठ वाजता संपत आहे. त्यापूर्वीच राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. आज सकाळीच महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी राज्यपाल कोशियारी यांची राजभवानात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. एका खासगी गाडीतून कुंभकोणी राजभनात दाखल झाले. त्यानंतर कुंभकोणी राज्यपाल यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. राष्ट्रपती राजवट लागू करण्या संदर्भातील कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. त्यानंतर राज्यपालांकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या संदर्भात केंद्रीय गृहखात्याला अहवालही पाठवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील दौऱ्यावर जाणार असून, तत्पूर्वी या संदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा असताना. आज, मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीतही शिफारशीची माहिती देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor submits a report to the president for President Rule in Maharashtra