भाजपला आणखी एका पक्षाचा रामराम; महाविकासआघाडीची संख्या झाली...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज ट्विट करत बहुजन विकास आघाडी महाविकासआघाडीत येत असल्याचे जाहीर केले आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षीतिज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी आज माझी भेट घेतली व महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

मुंबई : सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आता भाजपची एक-एक मित्रपक्ष साथ सोडताना दिसत आहेत. आज (बुधवार) बहुजन विकास आघाडीने भाजपला रामराम करत सत्तेत येणाऱ्या महाविकासआघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीचे संख्याबळ आता 169 झाले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज ट्विट करत बहुजन विकास आघाडी महाविकासआघाडीत येत असल्याचे जाहीर केले आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षीतिज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी आज माझी भेट घेतली व महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. बहुजन विकास आघाडीने दिलेल्या समर्थनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

मोठ्या ठाकरेंची संपत्ती पहिल्यांदाच कळणार; किती असेल?

भाजपचा आणखी एक मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनीही कालच महाविकासआघाडी सत्तेत येत असल्याचे पाहून भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र आल्याने भाजपला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. भाजप तीन दिवसांसाठी सत्तेत आल्यानंतर अनेक अपक्ष आणि छोट-छोट्या पक्षाकडून त्यांना पाठिंबा दिला होता. पण, आता सत्तेतून बाहेर गेल्यानंतर हे पक्षही त्यांची साथ सोडत आहेत. 

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Ashok Chavan says Bahujan Vikas Aghadi support MahaVikasAghadi