मोठ्या ठाकरेंची संपत्ती पहिल्यांदाच कळणार; किती असेल?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर आरोप केेेेले होते. त्यात संपत्ती जाहीर करावी सागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढत नाही हा आरोपही होता. त्यानंतर ठाकरे यांच्या संपत्तीची प्रामुख्याने चर्चा सुरु झाली होती. मात्र आता लवकरच ठाकरे यांच्या संपत्तीचे गुपित उघड होणार आहे.

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात विधीमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना आपली संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधान सभेची निवडणुक लढवताना त्यांची संपत्ती 16 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर आता उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ही शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागेल. ते माहिम मतदार संघातून निवडणुक लढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक लढताना त्यांना प्रतिज्ञापत्रावर स्वतःची संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर आरोप केेेेले होते. त्यात संपत्ती जाहीर करावी सागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढत नाही हा आरोपही होता. त्यानंतर ठाकरे यांच्या संपत्तीची प्रामुख्याने चर्चा सुरु झाली होती. मात्र आता लवकरच ठाकरे यांच्या संपत्तीचे गुपित उघड होणार आहे.

महाविकासआघाडीची उजडली 'पहाट'; आमदारांचे शपथविधी सुरु

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newly elected chief Minister Uddhav thackeray now Wealth has to be declared