
भाजपने नेत्यांची मेगाभरती करण्याऐवजी महाराष्ट्रातील तरूणांसाठी रोजगाराची मेगाभरती केली असती तर ते राज्याच्या अधिक हिताचे ठरले असते.
मुंबई : निवडणुकीपूर्वी केलेल्या मेगाभरतीमुळे भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का बसल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर त्याविषयी बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ती मेगाभरती फक्त चूक नव्हे, तर मेगाचूक होती असे म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची भाजपने मेगाभरती केली होती. या मेगाभरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भरतीच्या प्रयोगामुळेच भाजपचे नुकसान झाल्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली आहे. यावरून अशोक चव्हाण यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांनी तुमची मेगाचूक असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधींना निवडून केरळमधील जनतेने चूक केली : रामचंद्र गुहा
अशोक चव्हाण म्हणाले, की भाजपने नेत्यांची मेगाभरती करण्याऐवजी महाराष्ट्रातील तरूणांसाठी रोजगाराची मेगाभरती केली असती तर ते राज्याच्या अधिक हिताचे ठरले असते. त्यामुळे चंद्रकांतदादा, ती केवळ चूक नव्हती, तर 'मेगाचूक' होती.