नाना पटोलेंवर खरंच नाराज आहे का? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टचं सांगितलं : Balasaheb Thorat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole and Balasaheb Thorat politics

Balasaheb Thorat: नाना पटोलेंवर खरंच नाराज आहे का? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई : राज्यातील काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरीच धुसफूस सुरु आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेवर आज थोरातांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. पत्रकारांशी थोरात बोलत होते. (Congress leader Balasaheb Thorat speaks on discussion on upset with Nana Patole)

पत्रकारांनी थोरातांना प्रश्न विचारला की, ते अजूनही नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत का? यावर थोरातांनी उत्तर देताना म्हटलं, "कोण म्हणालं मी कोणावर नाराज आहे? सोशल मीडियातच तशी चर्चा सुरु आहे. मी कधीही असं म्हटलेलं नाही"

दरम्यान, नाना पटोले यांनी देखील नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, "थोरातांनी राजीनाम्याचं पत्र पक्षश्रेष्ठींना लिहिल्याची चर्चा होती. पण ते माझ्यापर्यंत आलेलं नाही, त्यामुळं ते नाराज असल्याचं मला वाटत नाही. तसेच काही इश्यू असतीलच तर ते सत्यजीत तांबे आणि थोरात यांच्याशी बोलून आम्ही सोडवू"