Nana Patole: 'आता शाप लागत नाही...', फडणवीसांवर टीका करताना नाना पटोले यांची घसरली जीभ, काय बोलले?

Nana Patole: देवेंद्र फडणवीसांनी अकलूजमध्ये बोलताना 'मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, परंतु माझ्यासोबत विश्वासघात केला की, त्यांचा सत्यनाश होतो', असं म्हटलं होतं. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
Congress leader nana patole criticized to dcm Devendra fadanvis on Akluj Public Rally statement
Congress leader nana patole criticized to dcm Devendra fadanvis on Akluj Public Rally statement Esakal

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सभा, प्रचार, दौरे यांना वेग आला आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सभा जोरदार सुरू आहेत. दरम्यान अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, परंतु माझ्यासोबत विश्वासघात केला की, त्यांचा सत्यनाश होतो, माझा इतिहास तपासा’, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

त्याचबरोबर शरद पवारांवर देखील हल्लाबोल केला होता. त्यावरती काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे, त्यावेळी पटोलेंची जीभ घसरली.

Congress leader nana patole criticized to dcm Devendra fadanvis on Akluj Public Rally statement
Police Recruitment 2024 : अबब..! १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज ; भरती प्रक्रिया उरकण्याचे गृह विभागासमोर आव्हान

'देवेंद्र फडणवीसांना हे बोलण्याचा आधिकार नाही. ते ब्राम्हण आहेत म्हणून त्यांचा शाप आता लागत नाही. ते ओरीजनल ब्राम्हण नाहीत ते मटण खाणारे ब्राम्हण आहेत. तुम्ही २०१४ मध्ये सत्तेत येण्यासाठी जे काही बोलला होतात, धनगरांना न्याय देऊ, मराठ्यांना न्याय देऊ, विविध जातींना न्याय देऊ, कुठं केलं ते सांगा.'

'त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हे बोलण्याचा आधिकार नाही आणि शाप देण्याचा आधिकार नाही. त्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला आहे. शाहु. फुले, आंबेडकर यांच्या विचाराला ज्यांनी काळीमा लावण्याचं पाप केलं, त्या फडणवीसांना बोलण्याचा आधिकार नाही पण, ते बोलत आहेत तर बोलू देत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Congress leader nana patole criticized to dcm Devendra fadanvis on Akluj Public Rally statement
Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

'मी कोणाच्या वाट्याला जात नाही. कोणाला त्रासही देत नाही. पण ईश्वराची देणगीच आहे. माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही. माझा इतिहास तपासा'.

‘पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाने बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली. आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे. त्यावेळेस आम्ही यांना जवळ केले कारखान्याला मदत केली.

संस्थेला मदत केली. मी जे करतो ते मनाने करतो तुम्ही धन्यवाद दिले तरी करतो नाही दिले तरी करतो. तुम्ही जनतेच्या मनातून मोदीजींना काढू शकत नाही’, असे म्हणत असताना ते पुढे असेही म्हणाले की, पवार साहेबांना जे जमलं नाही ते रणजीत सिंह निंबाळकरांनी दहा वर्षात करून दाखवलं म्हणून पवार साहेबांच्या तुमच्यावर राग आहे.’

Congress leader nana patole criticized to dcm Devendra fadanvis on Akluj Public Rally statement
Ravindra Waikar: ईडी कारवाई, शिंदे गटात प्रवेश अन् आता लोकसभा उमेदवारी... जाणून घ्या कोण आहेत रवींद्र वायकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com