सरकारनं संवैधानिक जबाबदारीचं पालन केलंय; राज ठाकरेंच्या कारवाईवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Sachin Sawant vs Raj Thackeray
Sachin Sawant vs Raj Thackerayesakal
Summary

'देशात भाजप व संघाच्या पाठबळावर अनेकजण संविधानाला खुलेआम आव्हान देत आहेत.'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला (Aurangabad Rally) पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांचं राज ठाकरेंच्या सभेकडं आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटव्दारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.

सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, देशात भाजप (BJP) व संघाच्या (RSS) पाठबळावर अनेकजण संविधानाला (Indian Constitution) खुलेआम आव्हान देत आहेत. याकडं मोदी सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मात्र, असं असलं तरी संविधान आणि कायद्याचं महत्त्व टिकलंच पाहिजे. महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi Government) अशांतता व धार्मिक वैमनस्य पसरवणाऱ्या राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करुन संविधानिक जबाबदारीचं निर्वहन केलंय, असंही सावंतांनी नमूद केलंय.

Sachin Sawant vs Raj Thackeray
'2024 मध्ये ममता बॅनर्जी राष्ट्रपतींकडून पंतप्रधान पदाची शपथ घेतील'

औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात (Aurangabad City Chowk Police Station) राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, कलम 116, 117 आणि 153 अ, भादवि 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद पोलिसांनी सभेला परवानगी देताना ज्या अटी-शर्थी घातल्या होत्या त्यांचं उल्लंघन झाल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com