'2024 मध्ये ममता बॅनर्जी राष्ट्रपतींकडून पंतप्रधान पदाची शपथ घेतील'

Narendra Modi vs Mamata Banerjee
Narendra Modi vs Mamata Banerjeeesakal
Summary

सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवार कोण? याबाबत चर्चा रंगलीय.

सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधात उमेदवार कोण? याबाबत चर्चा रंगली असतानाच, आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) याचं नाव चर्चेत आलंय. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष (Kunal Ghosh) यांनी ट्विटरव्दारे अभिषेक बॅनर्जी 2036 मध्ये बंगालचे मुख्यमंत्री होतील असं सांगितल्याच्या एका दिवसानंतर, टीएमसी खासदार अपरूपा पोद्दार (Aparupa Poddar) यांनी त्यांच्या ट्विटचं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळं मोदींसमोर ममता बॅनर्जी आव्हान उभं करणार की काय? याची उत्सुकता लागून राहिलीय.

खासदार पोद्दार यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, '2024 मध्ये ममता बॅनर्जी RSS-निवडलेल्या राष्ट्रपतींकडून पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, तर अभिषेक बॅनर्जी बंगालचे मुख्यमंत्री होतील.' असं त्यांनी नमूद केलं होतं. परंतु, हे ट्विट केल्यानंतर काही वेळातच पोद्दार यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलंय. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

Narendra Modi vs Mamata Banerjee
गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! वाघेलांनंतर 'या' आमदारानं दिला राजीनामा

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) तिसऱ्या टर्मच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटलं होतं की, अभिषेक बॅनर्जी 2036 मध्ये बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वीकारतील. 'तृणमूल काँग्रेसचा एक सैनिक या नात्यानं मी सांगू शकतो की, ममता बॅनर्जी 2036 पर्यंत बंगालच्या मुख्यमंत्री असतील आणि 2036 मध्ये अभिषेक बॅनर्जी (ममता यांचा पुतण्या) शपथ घेणार असलेल्या समारंभात मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहतील, असं घोष यांनी ट्विट केलं होतं. त्यांच्या ट्विटनंतर खासदार पोद्दारांनी त्यांना स्पष्टीकरण दिलं होतं.

Narendra Modi vs Mamata Banerjee
'हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा'; काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

काही लोक हिंदू-मुस्लिमांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत : ममता बॅनर्जी

सध्या देशभरात हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) वाद उफाळून आलाय. त्यातच आता हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद भोंगे यांसारखे मुद्देही चांगलेच गाजत आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधलाय. ईदच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, आज देशात फूट पाडा आणि राज्य करा, हे धोरण राबवलं जातंय; पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. काही लोक हिंदू आणि मुस्लिमांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा डाव हाणून पाडा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय. ईदनिमित्त जनतेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com