Sunil Kedar: काँग्रेस नेते सुनील केदार यांना आणखी एक मोठा धक्का! आधी पाच वर्षांची शिक्षा, आता आमदारकीही रद्द

Sunil Kedar: काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.
Sunil Kedar
Sunil KedarEsakal

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांना दुसरा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावास आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे. यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते, त्यानंतर केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

Sunil Kedar
Sunil Kedar : काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार? चेंडू नार्वेकरांच्या कोर्टात

राज्याचे माजी पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसी) कोट्यवधी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. तर इतर तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत.

Sunil Kedar
Sunil Kedar यांना ५ वर्षे तुरुंगवास, १० लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय? | Rahul Gandhi

बँकेत हा घोटाळा झाला त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. एकूण ११ पैकी ९ आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात), ४०९ (शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात), ४६८ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज खरे भासविणे), १२०-ब (कट रचणे) व ३४ (समान उद्देश) हे दोषारोप निश्चित करून हा खटला चालविण्यात आला. आता या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Sunil Kedar
Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनिल केदार यांना न्यायालयाचा मोठा धक्का; बँक घोटाळ्यात दोषी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com