
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात विधिमंडळात पोहोचले आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात विधिमंडळात पोहोचले आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या इतर नेत्यांशी चर्चा केल्यानंतर भाजपने किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचे नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होणार आहेत हे स्पष्ट झालंय.
ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा
काय घडले?
आमच्याकडे पूर्ण बहुमत महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर 169 आमदरांनी विश्वास दाखवला आहे. आज अध्यक्षपदाच्या निवडीत त्या पेक्षा अधिक मतदान आम्हाला होईल, असा विश्वास आम्हाला आहे. कशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया घेतली तरी, चिंतेचं काही कारण नाही.
एकनाथ शिंदे, नेते, शिवसेना
बिनविरोध निवडीची महाराष्ट्रात परंपरा आहे. आजही बिनविरोध निवड होईल, अशी आम्हाला आशा आहे. परंपरा कायम राहील, अशी अपेक्षा आहे.
नाना पटोले, महाविकास आघाडीचे उमेदवार
विधानसभा अध्यक्षांची निवड ही बिनविरोध होण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. हे सभागृहातील सर्वोच्च पद आहे. त्यामुळं आम्ही यावेळीही विधानसभा निवडणूक बिनविरोध होईल, यासाठी प्रयत्न करत आहोत.
छगन भुजबळ, नेते राष्ट्रवादी काँग्रेस
उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयुक्तपणे घेतील. मी सुरुवातीपासून हे सांगत आलो आहे.
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेससत्ताधारी पक्षाकडून बिनविरोध निवडीचं आवाहन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षपद वादात आणायचं नाही, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. आम्ही भाजप नेत्यांची, सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी जवळपास 45 मिनिटे चर्चा करून, किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
- चंद्रकांत पाटील, भाजप नेते