शिवसेनेला पाठिंबा देण्यावर काँग्रेसची सहमती; सूत्रांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आमदारांना काँग्रेसशासित राजस्थानातील जयपूरमध्ये ठेवले आहे. जयपूरमध्ये काँग्रेसचे 25 ते 30 आमदार असून, आज (रविवार) काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी या सर्वांसोबत बैठक घेतली.

जयपूर : महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले, की पुन्हा निवडणूक लढण्याचा भाजपचा डाव आहे. राज्यपालांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर राजकीय समीकरणे बदलत जातील. भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडतील. 

संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट आणि पुन्हा...

काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आमदारांना काँग्रेसशासित राजस्थानातील जयपूरमध्ये ठेवले आहे. जयपूरमध्ये काँग्रेसचे 25 ते 30 आमदार असून, आज (रविवार) काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी या सर्वांसोबत बैठक घेतली. मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून काँग्रेस आमदारांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सावध झाला आहे. आज झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमती झाल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leaders may be supports Shivsena in Maharashtra