ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक; PM मोदींच्या घरावर मोर्चा

काँग्रेस नेत्यांचा एक गट राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनाकडेही जाणार आहे.
Congress Protest on Modi's house
Congress Protest on Modi's houseSakal

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सध्या गांधी परिवाराची ईडी चौकशी सुरू आहे. या दरम्यान आज काँग्रेस वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसने पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा इशारा दिलाय. (Congress Protest in Delhi)

Congress Protest on Modi's house
National Herald case : आम्ही मोदींना घाबरणार नाही - राहुल गांधी

काँग्रेसच्या या घोषणेनंतर दिल्लीत जंतरमंतर वगळता इतर सर्व ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तर या आंदोलनाबद्दल काँग्रेस ऑफिसच्या बाहेरही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या आंदोलनाच्या आधी राहुल गांधी पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर राहुल गांधी काँग्रेसच्या खासदारांसोबत संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढतील.

Congress Protest on Modi's house
काँग्रेस उद्या राजभवनाला घालणार घेराव; नाना पटोलेंनी दिला इशारा

तर प्रियंका गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस मुख्यालय ते पंतप्रधान निवास असा मोर्चा काढतील. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ईडी चौकशीवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. आपण पंतप्रधान मोदींना घाबरत नाही आणि धमकावून आपला आवाज दाबला जाऊ शकणार नाही.

ईडीने आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतलं नॅशनल हेराल्ड कार्यालयातला यंग इंडियन कंपनीचा परिसर सील केला आहे. तर काँग्रसेने दावा केलाय की, दिल्ली पोलिसांनी त्यांचं मुख्यालय आणि सोनिया गांधी, राहुल गांधीच्या घराभोवती वेढा घातला आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com