esakal | काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?; आजच अंतिम निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?; आजच अंतिम निर्णय 

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की आमची बैठक झाली असून, या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांशी बोलून चार वाजता अंतिम निर्णय घेणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करू. 

काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?; आजच अंतिम निर्णय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस सकारात्मक असून, महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांची दिल्लीत पुन्हा होणार बैठक आज (सोमवार) दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की आमची बैठक झाली असून, या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांशी बोलून चार वाजता अंतिम निर्णय घेणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करू. 

महाराष्ट्रात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. जनादेश एका युतीसाठी आले होते. पण, महाराष्ट्रात सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. याबाबत चर्चा सुरु आहे, असे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

काँग्रेसचे प्रमुख आमदार जयपूरमध्ये असून, काँग्रेसचे नेतेही तेथेच आहे. काँग्रेसच्या आमदारांचे समर्थन पत्र प्रमुख नेत्यांकडे असून, ते आज दुपारी दिल्लीला येणार आहेत. त्यानंतर ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. पण, काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

रास्ते की परवाह करूँगा तो... : संजय राऊत