
मुंबई : राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Session) सुरू आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. याविरोधातील याचिका न्यायालयाने देखील फेटाळून लावल्या. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा (Maharashtra Assembly Speaker Election) मार्ग मोकळा झाला असून उद्या काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माहिती दिली. पण, या निवडणुकीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं कळतंय.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उद्या म्हणजेच बुधवारी बैठक होणार आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षांबाबत चर्चा केली जाईल. आता न्यायालयाने देखील स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे राज्यपाल महोदय देखील निवडणुकीसाठी वेळ देतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पण, या निवडणुकीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे. त्यासाठी काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीला गेले असून काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा करणार आहेत.
काँग्रेसचे नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. मात्र, त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक आवाजी मतदानानं घेण्याचा निर्णय गेल्या अधिवेशनात घेण्यात आला होता. पण, विरोधक आणि राज्यपालांनी त्याला विरोध केला. त्यामुळं निवडणूक रखडली होती. गिरीश महाजन तसेच आणखी एका व्यक्तीनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले होते. पण, मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाने गिरीश महाजनांना याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी १० लाख रुपये डिपॉझिट भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अखेर कोर्टाने याचिका घेत प्रकरण निकाली काढलं.
गिरीज महाजन यांची याचिका फेटाळताना न्यायालयानं सरकार आणि राज्यपालांना देखील सुनावले होते. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील वादामुळे सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहे. आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षपद निवड याचिकेत वैधता दिसत नाही, असं हायकोर्टाचे परखड मत मांडलं आहे. राज्यपालांनी अद्यापही नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवर निर्णय घेतलेला नाही. हे दुर्दैवी असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं होतं. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.