अब्दुल सत्तार म्हणजे, 'जिधर डम-डम उधर हम-हम'; काँग्रेस नेत्याची जहरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar

अब्दुल सत्तार म्हणजे, 'जिधर डम-डम उधर हम-हम'; काँग्रेस नेत्याची जहरी टीका

जालना - पूर्वाश्रमीचे काँग्रेसनेते अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये असतानाच भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र सिल्लोड मतदार संघ शिवसेनेकडे असल्यामुळे आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे सत्तार यांना शिवसेनेत जावं लागलं. शिवसेनेत गेलेल्या सत्तार यांना महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्रीपदही मिळाले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सामील होऊन सत्तार आता कॅबिनेट मंत्री बनले आहेत. मात्र काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. (Abdul Sattar news in Marathi)

हेही वाचा: भीषण अपघात: भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली; 27 जणांचा मृत्यू

अब्दुल सत्तार म्हणाले की, अब्दुल सत्तार कोणाचेच होऊ शकत नाही. माणिकदादा पालोदकर यांनी सत्तार यांना नगराध्यक्ष केलं ते त्यांचे झाले नाही. मी विधान परिषद सदस्य केलं, माझे झाले नाही, विलासराव देशमुखांचे झाले नाही. नारायण राणेंचे झाला नाही, उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं त्यांचे झाले नाही. मग एकनाथ शिंदेंचे काय होणार, असा सवाल गोरंट्याल यांनी केला.

हेही वाचा: गौप्यस्फोटांना सुरुवात! उद्धव यांना १९९६ मध्येच व्हायचं होतं CM; शिंदे गटाचा खुलासा

अब्दुल सत्तार म्हणजे 'जिधर डम-डम उधर हम-हम', अशी खोचक टीकाही गोरंट्याल यांनी केली. गोरंट्याल हे काँग्रेसचे जालना मतदार संघाचे आमदार आहेत.

शिवसेनेत बंडखोरी केल्यापासून अब्दुल सत्तार चर्चेत आले आहेत. शिंदे सरकारमध्ये सत्तार यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून त्यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.