गौप्यस्फोटांना सुरुवात! उद्धव यांना १९९६ मध्येच व्हायचं होतं CM; शिंदे गटाचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

गौप्यस्फोटांना सुरुवात! उद्धव यांना १९९६ मध्येच व्हायचं होतं CM; शिंदे गटाचा खुलासा

मुंबई - यंदाच्या दसरा मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यात येत आहे. मात्र आता नवनवीन गौप्यस्फोट सुरू झाले असून शिंदे गटाने मोठमोठे खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी मंत्री संदीपान भुमरे यांनी हल्ला केल्यानंतर आज माजीमंत्री आणि शिंदे गटातील नेते सुरेश नवले यांनी बॉम्ब टाकला आहे. (Uddhav Thackeray news in Marathi)

हेही वाचा: Shivsena: शिंदे गटाकडून ठाकरेंना खोक्याचे उत्तर 'खोक्या'ने; भुमरेंचा मोठा गौप्यस्फोट

सुरेश नवले म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंचा विश्वासू कधीच नव्हतो. मी बाळासाहेबांचा विश्वासू होतो. उद्धव ठाकरे यांची १९९६ मध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यामुळे उध्दव यांनी आमची इच्छा नसताना आणखी काही आमदारांना घेऊन बाळासाहेबांना भेटा आणि मला मुख्यमंत्री करा, असं सांगण्याचा आग्रह केला. त्यानुसार आम्ही आग्रह केला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आमच्यावर नाराज झाले होते.

दरम्यान आम्ही बाळासाहेबांना सांगितलं की, उद्धव यांना मुख्यमंत्री करा. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला विचारलं की, तुम्ही स्वत:हून हे सांगताय की, तुम्हाला कोणी पाठवलं. त्यावर आम्ही बाळासाहेबांना खोट बोललो. आम्ही स्वत:हून आल्याचं म्हटलं. मात्र आम्हाला उद्धव यांनीच पाठवलं होत, असंही नवले यांनी नमूद केलं.

हेही वाचा: Shivsena: शिंदे गटाकडून ठाकरेंना खोक्याचे उत्तर 'खोक्या'ने; भुमरेंचा मोठा गौप्यस्फोट

तत्पूर्वी संदीपान भुमरे यांनी देखील उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. खरे गद्दार तुम्ही आहे. गडाख यांच्यासोबत तुम्ही काय व्यवहार केला हे आम्हाला माहित आहे. उगाच गडाख यांना तुम्ही मंत्री केलं नाही. तुमच्याकडे मंत्री, आमदार होते. तुम्हाला गरज काय होती, गडाखांची. एखादा शिवसैनिक का नाही मंत्री केला? असा सवाल भुमरे यांनी केला होता. तुम्ही गडाख यांच्याकडून किती खोके घेतले, हे आम्हाला माहित असल्याचं भुमरे यांनी म्हटलं होतं.