esakal | काँग्रेसच्या 'यांनी' घेतली उद्धव ठाकरेंची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

गांधी घराण्याशी जवळीक असणारे अशी गाडगीळ कुटुंबाची ओळख आहे.काँग्रेसने अनंत गाडगीळ यांची 2004 मध्ये राष्ट्रीय प्रवक्ता पदावर नियुक्ती केली. यानंतर 2014 मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. पण अनंत गाडगीळ हे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहेत.

काँग्रेसच्या 'यांनी' घेतली उद्धव ठाकरेंची भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आणि प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी काल रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट आपल्या मुलाची लग्नं पत्रिका देण्यासाठी असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र असं असलं तरी अनंत गाडगिळ यांची विधान परिषदेतील मुदत पुढच्या वर्षी संपत आहे. त्यामुळे आत्ता पासुनच अनंत गाडगिळ यांनी शिवसेना प्रवेशासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं बोललं जातं आहे.

गांधी घराण्याशी जवळीक असणारे अशी गाडगीळ कुटुंबाची ओळख आहे.काँग्रेसने अनंत गाडगीळ यांची 2004 मध्ये राष्ट्रीय प्रवक्ता पदावर नियुक्ती केली. यानंतर 2014 मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. पण अनंत गाडगीळ हे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहेत. काँग्रेसचे काही नेते आणि प्रवक्ते त्यांना डावलत असल्याचा त्यांना आरोप आहे. शिवाय पुढच्या वर्षी त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांनी शिवसेनेशी जवळीक साधल्याचं बोललं जातं आहे.

loading image
go to top