Vinayak Mete : अपघातानंतर मेटे साहेब माझ्याशी बोलले, पण..; कार चालकानं सांगितला पहाटेचा थरारक प्रसंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Mete Accident News

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं.

अपघातानंतर मेटे साहेब माझ्याशी बोलले, पण..; कार चालकानं सांगितला पहाटेचा थरारक प्रसंग

Vinayak Mete Accident News : शिवसंग्राम पक्षाचे (Shiv Sangram Party) अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं कार अपघातात निधन झालं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express Highway) खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

गाडी बोगद्यात जाताच भीषण अपघात

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या मेटे यांच्या निधनानं सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक मेटे हे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह बीडहून (Beed) मुंबईकडे येत होते. मात्र, खालापूर टोलनाक्याजवळ गाडी बोगद्यात जाताच भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मेटे यांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी आल्या. अखेर काही वेळानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अपघाताचं स्वरुप भीषण असल्याने मेटे यांना हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळं त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा: 'हर घर तिरंगा'ला अद्भूत प्रतिसाद, पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले, तिरंग्याची ताकद काय आहे हे..

मदतीसाठी प्रत्येकाला विनवणी केली, पण..

दरम्यान, मेटे यांचे सहकारी चालक एकनाथ कदम (Eknath Kadam) हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी एका वृत्त वाहिनीनं संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडं येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकनं कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो. मात्र, कुणीही गाडी थांबवली नाही.

हेही वाचा: शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलाय, असं का म्हणाले शिंदे गटाचे गोगावले

अपघातानंतर मेटे साहेब माझ्याशी बोलले : गाडी चालक कदम

मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं चालक कदम यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवालांनी आपल्या मुलांसाठी मागं सोडली 'इतकी' संपत्ती!

मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता गमावला : एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात धाव घेतली. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची चौकशी केली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दुर्दैवी आणि दु:खद बातमी मला समजली, माझा विश्वास बसला नाही. शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं निधन झालं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारा नेता, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा नेता अशी ओळख होती, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. गेल्या आठवड्यात त्यांची भेट झाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही आहात मराठा समाजाला न्याय मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

Web Title: Former Mla Vinayak Mete Car Driver Eknath Kadam Told How The Accident Happened

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BeedMumbaivinayak mete