esakal | नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?

नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काँग्रेसचे नेते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडील खाते मिळावे, अशी पटोले यांची इच्छा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच पटोले, राऊत यांच्या कुरघोड्या होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यातून राऊत हे दिल्ली गाठून पटोले यांच्याविरोधात तक्रारी मांडत असल्याचेही समजते. अशा स्थितीत काँग्रेसमधील काही मंत्री, आमदार, पदाधिकारीही खासदारांना पटोले यांना विरोध असल्याचे दिसून येत आहे.

आधी स्वबळावरून मुख्यमंत्र्यांची नाराजी, पाळत ठेवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्र्यांचा रोष, स्वपक्षाचे नितीन राऊतांच्या दिल्लीवाऱ्या, फोन टॅपिंग प्रकरणावरून चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीने काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. स्वपक्षातील नेते, आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना व ‘राष्ट्रवादी’ दुखावल्याने दिल्लीतील काँग्रेसचे काही नेते पटोले यांच्यावर नाराजी असल्याचे बोलले जात आहे; मात्र, पटोले यांच्या ‘स्टाइल’वर काँग्रेस नेते राहुल गांधी खूष असल्याने दिल्ली दरबारातून त्यांना बळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.

हेही वाचा: 4 जुलै रोजीच आली तिसरी लाट, संशोधकाचा दावा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पटोले हे राज्यभर फिरून आक्रमपणे काँग्रेसची भूमिका मांडत आहेत. त्यात आगामी निवडणुकांत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे पटोले यांनी सलग दोनदा जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांच्यावर प्रत्यक्षपणे टीका केली. त्याआधी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून ठाकरे हे पटोले यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर स्वबळाच्या हाकेपासून मागे हटण्याचा सल्ला पटोले यांना दिल्लीत बोलावून वरिष्ठांनी दिला. त्यावरून पटोले यांच्याबाबत चर्चा रंगली. या घटना ताज्या असतानाच आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप करीत पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने गृहखात्याला लक्ष केले. त्यावरून ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोले यांना फटकारले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इतरांकडून शिकवण घेण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यामुळे आघाडीत नव्या वादाला सुरूवात झाल्याची असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडणी दिली. त्यामुळे घटक पक्षांतील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले.

हेही वाचा: उद्योगांसाठी टास्क फोर्स उभारणार - मुख्यमंत्री ठाकरे

loading image