esakal | उद्योगांसाठी टास्क फोर्स उभारणार - मुख्यमंत्री ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

उद्योगांसाठी टास्क फोर्स उभारणार - मुख्यमंत्री ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट आलीच तर त्याला तोंड देण्यासाठी उद्योग टास्क फोर्स उभारण्यात येणार असून त्याच्यावर थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे नियंत्रण असेल. उद्योगांनी खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून त्यांच्या कामगारांचे लसीकरण करून घ्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत उद्योजकांना सुचविले. कोरोना काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये, या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या. कोरोना काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे चक्र सुरू ठेवण्याचे आदर्श उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन करावे, उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याबरोबरच निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवावे, उत्पादनावर त्याचा परिणाम होता कामा नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. आजच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 10-12वी पासही करु शकतात अर्ज

यांचाही सहभाग
या ऑनलाइन बैठकीत सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलिल पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी. त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्ब्ज, डी. के. सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवानी, शरद महिंद्रा आदी उद्योगपती सहभागी झाले होते.

हेही वाचा: केंद्रीय मंत्री भागवत कराडांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री म्हणाले
ऑक्सिजन निर्मिती, साठ्यावर लक्ष हवे
खासगी रुग्णालयांकडील लससाठा वापरा
छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये बायो बबल हवे
कामगारांसाठी फिल्ड निवास व्यवस्था हवी
कोरोना नियम प्रत्येकाने पाळायलाच हवे

loading image