''पंजाबमधील घटनेमागे अमित शाह यांचा तर हात नाही ना?''

Nana Patole on Amit Shah
Nana Patole on Amit Shahe sakal

मुंबई : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये गंभीर चूक (PM Security Breach) झाल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. पंजाबमधील सभेसाठी जात असताना पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपूलावर १५-२० मिनिटे अडकून पडला होता. त्यावरून पंजाबमधील काँग्रेस (Punjab Congress) सरकारवर आरोप केले जात आहेत. याबाबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) यांनी भाजपला काही गंभीर सवाल विचारले आहेत.

Nana Patole on Amit Shah
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? कशी असते व्यवस्था? जाणून घ्या

''पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ही एसपीजीची आहे. तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षेत काही चूक असल्यास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला माहिती असतं. पंजाबमधील कालच्या घटनेमध्ये पंजाबचे सरकार जबाबदार आहे, असं भासवून पुन्हा नौटंकीच्या आधारे पाच राज्यातील निवडणुका जिंकता येतात का? अशी शंका आहे. या घटनेमागे अमित शाहांचा हात तर नाही ना?'' असा सवाल पटोलेंनी भाजपला विचारला आहे. शेतकऱ्यांचे, गरीबांचे प्रश्न आहेत. त्यावरून लक्ष हटविण्यासाठी पंतप्रधान अनेक रुप बदलवतात. तशाचप्रकारे रुप बदलवणारी कालची घटना होती का? असाही सवाल पटोलेंनी उपस्थित केला.

''देशाच्या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, दहशवातवादी अशा पद्धतीच्या उपमा देणाऱ्या पंतप्रधानांना धडा शिकविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. पण, हा कलंक कसा पुसता येईल? हा एक अयशस्वी प्रयत्न भाजपनं केला आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. अशी घटना घडवून काही डाव साधण्याचा त्यांचा प्रयत्न तर नाही ना? याबाबत देशाच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पंजाब सरकारने चौकशी सुरू केली. नेमकं काय घडलं होतं? ते लवकरच पुढे येईल'', असंही पटोले म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवेदनात काय म्हटलंय? -

मोदींची पंजाबमधील सभा का रद्द झाली? याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं एक निवेदन जारी केलं आहे. निवेदनानुसार, ''पंतप्रधान मोदी सकाळी भटींडा विमानतळावर पोहोचले होते. ते तिथून हेलिकॉप्टरद्वारे हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकाला जाणार होते. त्यावेळी पंजाबमध्ये ढगाळ वातावरण होतं. २० मिनिटं वाट पाहून वातावरण ठीक झालं नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्याने कार्यक्रमस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. पंजाब पोलिस महासंचालकांकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत हमी मिळाल्यानंतर मोदींचा ताफा रवाना झाला. एका उड्डाणपुलावर १५-२० मिनिटे ताफा अडकून पडला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक होती'' असं निवेदनात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com