esakal | काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राज्यभरातील आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले होते. त्यातच पटोले यांच्या काही वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमधील मतभेद आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अशोक चव्हाण यांनी या भेटीचं छायाचित्र आपल्या ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

मागील काही दिवसांपासून नाना पटोले यांनी सतत स्वबळाची भाषा केली होती. त्यातच भर म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही निशाणा साधला होता. यामुळे महाविकास आघाडीमधील संबध बिघडल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची पवारांसोबत झालेल्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत नेमकं काय झालं हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, पटोलेंच्या सततच्या बेताल वक्तव्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?

महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेल्या एच. के. पाटील यांनी पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. स्वपक्षातील गटबाजी, पटोले यांची विधाने, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, त्यावरील हक्क, ओबीसी आरक्षण या मुद्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. ‘‘कोरोनामुळे निवडणुका पुढे गेल्याने तयारीसाठी वेळ असून, त्यात २२ महापालिका, २४ जिल्हा परिषदा आणि १४४ नगरपालिकांच्या निवडणुकांची रणनीती ठरविण्यात येत आहे. त्याची तयारी पक्ष करीत आहे. त्यासाठी संघटनेतील काही समित्यांची फेररचना करण्यात येणार आहे,’’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: 4 जुलै रोजीच आली तिसरी लाट, संशोधकाचा दावा

अध्यक्षपदावरून वाद नाहीत

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस आणि आघाडीच्या मित्रपक्षांत कोणतेही वाद नाहीत. हे पद काँग्रेसकडे राहणार असून, कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली आहे. ती योग्य वेळी होईल, असे सांगून एच. के. पाटील यांनी अध्यक्षपदावरील काँग्रेसचा अधिकार कायम असल्याचे स्पष्ट केले. यावरून शिवसेना-काँग्रेसमधील मतभेद उघड झाले आहेत.

हेही वाचा: उद्योगांसाठी टास्क फोर्स उभारणार - मुख्यमंत्री ठाकरे

loading image