राष्ट्रवादीपुढे काँग्रेसचे पुन्हा 'लोटांगण'

गुरुवार, 3 मे 2018

आघाडी धर्मात विरोधी पक्षातून येणारा आमदार अथवा खासदार ज्या पक्षात प्रवेश करतो त्या पक्षाला संबधित मतदार संघ देण्याचे सुत्र आहे. मात्र भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही या मतदारसंघावर ताबा मिळवण्यात काँग्रेसला अपयश आले. यामुळे नाना पटोले यांच्या दिल्लीतल्या राजकारणाला खिळ बसली असून आता त्यांना आगामी विधानसभेसाठीची तयारी करावी लागेल. 

मुंबई : आघाडी धर्मात सतत काँग्रेसला बॅकफुटवर ढकलण्याची परंपरा राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळीही कायम ठेवली. लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेतल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ देखील स्वत:कडेच राखण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले. राजकारणात कठीण काळ सुरू असल्याने राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यापुढे काँग्रेसला सपशेल लोटांगण घालावे लागले. 

आघाडी धर्मात विरोधी पक्षातून येणारा आमदार अथवा खासदार ज्या पक्षात प्रवेश करतो त्या पक्षाला संबधित मतदार संघ देण्याचे सुत्र आहे. मात्र भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही या मतदारसंघावर ताबा मिळवण्यात काँग्रेसला अपयश आले. यामुळे नाना पटोले यांच्या दिल्लीतल्या राजकारणाला खिळ बसली असून आता त्यांना आगामी विधानसभेसाठीची तयारी करावी लागेल. 

दरम्यान, राष्ट्रवादीने परभणीची जागा काँग्रेसला सोडलेली असली तरी लातूर-उस्मानाबाद-बीड मधे वंजारी समाजातील मातब्बर भाजप नेते रमेश कराड यांना उमेदवारी देत आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने बेरजेच्या राजकारणाचे समीकरण जुळवल्याचे मानले जाते. 

2014 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीत बेबनाव होवून पंधरा वर्षाची आघाडी मोडित निघाली होती. विधानसभेत राष्ट्रवादी व काँग्रेसपेक्षा केवळ एका जागेनं मागे आहे. त्यामुळे आगामी जागावाटपात राष्ट्रवादी 50-50 चे सुत्र रेटून नेईल असे संकेत आहेत.

Web Title: Congress NCP alliance in Loksabha by poll