मुख्यमंत्री म्हणतात, आधी मुलगा भाजपमध्ये...मग वडील....!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

आज संदीप नाईक, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर, वैभव पिचड यांच्या सोबतच मधुकर पिचड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रवेश केलेल्या नेत्यांचा आपल्या भाषणात गौरव केला. त्याचवेळी त्यांनी आधी मुलगा मग वडील हे 'रहस्य' सांगून टाकले.

मुंबई : ''आम्ही आधी सुजय विखेंना पकडलं मग राधाकृष्ण आले. आम्ही वैभव पिचड याना पकडलं मग मधुकर राव आले.आता संदीप नाईक आले, म्हणजे गणेश नाईक येतील.'' असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून आजवर झालेल्या प्रवेशांचे 'रहस्य' उघड केले. 

आज संदीप नाईक, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर, वैभव पिचड यांच्या सोबतच मधुकर पिचड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रवेश केलेल्या नेत्यांचा आपल्या भाषणात गौरव केला. त्याचवेळी त्यांनी आधी मुलगा मग वडील हे 'रहस्य' सांगून टाकले.

मुख्यमंत्री म्हणाले, "चित्राताई वाघ आल्याने खऱ्या महिला नेत्या आमच्याकडे आल्या. विषय घेऊन संघर्ष करणं आणि टोकाला नेऊन न्याय मिळवणं हे त्या. करतात. चित्र ताई यांच्या प्रवेशावर पवार यांना बोलावं लागलं यापेक्षा अधीक ते काय. कालिदास कोळंबकर हा जनतेचा माणूस आहे. आज ते 7 वेळा निवडून आले आहेत. मिल कामगार आणि पोलीस यांचं कल्याण झाल्या शिवाय कालिदास कोलामकर हे काही शांत बसत नाहीत. गेल्या अनेक वर्षात त्यांनी माझ्या मागे लागून अनेक गोष्टी करून दाखवल्या. आता यांच्यासह अनेकांना नक्की न्याय मिळेल. शाहूराजे घराण्यांचे वंशज छत्रपती समरजित राजे घाडगे, छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज शिवेंद्र राजे यांचा प्रवेश ही अभिमानाची गोष्ट आहे. या महाराष्ट्राला ज्यांनी अस्मिता दिली ते छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. मोदी यांनीही देशव्यापी प्रचाराची सुरुवात रायगडावर जाऊन केली आणि ते देशाचे पंतप्रधान झाले. आज छत्रपतींचे वंशज हे भाजपमध्ये येत आहे हा आमचा सन्मान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCP leaders enters BJP presence of CM Devendra Fadnavis