प्रियांका गांधींना अटक उत्तरप्रदेशात आणि निदर्शनं महाराष्ट्रात (व्हिडिओ))

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 19 जुलै 2019

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना स्थानबद्ध केल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला जात आहे. सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. 

सांगली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना स्थानबद्ध केल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला जात आहे. सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. 

सोनभद्र हत्याकांडातील जखमींना भेट देण्यासाठी गेले असता प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. सांगलीच्या काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच 'दादागिरी नहीं चलेंगी' अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

अमरावतीतही निर्दशने

प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये अटक झाल्यानंतर अमरावती येथे निदर्शने करण्यात आले. संपूर्ण देशात काँग्रेसकडून तीव्र निषेध केला जात आहे. अमरावती काँग्रेस कमिटीच्या वतीने इर्विन चौकात भाजप सरकारविरोधी घोषणा देत तीव्र शब्दामध्ये निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा अत्यंत माजला आहे, त्यांनी देशात दडपशाही सुरू केली, अशा तीव्र शब्दांत अमरावती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी व्यक्त केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Party Workers Opposes Arrest of Priyanka Gandhi