रणनीती तयार; आमदार फुटण्याचे धाडस करणार नाहीत : थोरात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

आमची रणनीती तयार असून, सत्ता संघर्षाच्या काळात एकही आमदार फुटण्याचे धाडस करणार नसल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी युतीत तणाव वाढत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आपआपल्या चाली खेळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरु असतानाच काँग्रेसच्याही नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

मुंबई : आमची रणनीती तयार असून, सत्ता संघर्षाच्या काळात एकही आमदार फुटण्याचे धाडस करणार नसल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी युतीत तणाव वाढत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आपआपल्या चाली खेळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरु असतानाच काँग्रेसच्याही नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

चकमकीत दोन नक्षलवादी ठार

थोरात म्हणाले की, आम्ही काही रणनीती बनवली आहे, राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधी यांना कळवली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जनमत भाजपच्या विरोधात गेलं आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सरकार बनलं पाहिजे, भाजपने बनवावं, पण सध्या तसं घडताना दिसत नाही. याला कारण भाजप आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही, याला जबाबदार भाजपच असल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळेल - सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रपती राजवटीने कोणी घाबरुन जाणार नाही. अध्यक्ष निवडीची वेळ आली तर आघाडीचा उमेदवार आम्ही देणार आहोत. जर भाजपने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाला तर सरकारचा पराभव असतो, असेही थोरात म्हणाले. तसेच, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. काळजीवाहू सरकार आहे तर त्यांनी जनतेची काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा थोरातांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress president balasaheb thorat says no mla will leave party