कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळेल - मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत चाललेला असतानाच भारतीय पक्षाच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते असे म्हटले आहे. शिवसेनेसमोर चर्चेसाठी भाजपची 24 तास दार खुली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत चाललेला असतानाच भारतीय पक्षाच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते असे म्हटले आहे. शिवसेनेसमोर चर्चेसाठी भाजपची 24 तास दार खुली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार

आम्ही शिवसेनेची वाट बघणार असून आमचेच सरकार सत्तेत येणार असून देवेंद्र फडणवीस हेच पु्न्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करणार असून आम्ही सेनेला प्रस्ताव पाठवला आहे. आता आम्हाला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतिक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी चिराग पासवान

युतीतील तिढा आमच्या दृष्टीने संपला असून आता शिवेसेनेने एक पाऊल पुढं यायला हवं, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. परंतु आम्ही शिवसेनेची वाट बघणार आणि आमचंच सरकार सत्तेवर येणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP and sena may make government says Sudhir Mungantiwar