विधानसभेत धानाच्या पेंड्या फेकणारे आमदार ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, वाचा बंडखोर 'नानां'चा प्रवास

congress president nana patole profile nagpur news
congress president nana patole profile nagpur news

नागपूर : नाना पटोलेंचा जन्म यांचा जन्म ५ जून १९६३ ला भंडारा येथे सर्वसाधारण कुटुंबात झाला. वडील अधिकारी होते. त्यामुळे त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हतीच. मात्र, नानांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कधी  मागे वळून पाहिलेच नाही. जिल्हा परिषद सदस्यापासून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे.

नाना पटोले यांची 1990 मध्ये भंडारा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी  लाखांदूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढविली. त्यावेळी ते निवडूनही आले. त्यानंतर २००४ ला त्यांनी काँग्रेसच्याच तिकीटावर निवडणूक लढविली. मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यावरून ते विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले होते. विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, यासाठी त्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यांनी विधानसभेत धानाच्या पेंड्याही फेकल्या होत्या. तेव्हापासून बंडखोर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेते म्हणून नानांची विदर्भात ओळख आहे. शेवटी विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारने योग्य न्याय न दिल्याने त्यांनी २००९ च्या आमदारकीची टर्म पूर्ण होण्यासाठी ८ महिने बाकी असताना आमदारकीला लाथ मारत राजीनामा दिला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे एकच ध्येय्य होते, की विदर्भातील जनतेला न्याय मिळवून देणे. २००९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. ते विजयही झाले. त्यावेळीही त्यांनी विधानसभा गाजविली. त्यांचे काम पाहून त्यांना २०१४ ला भाजपकडून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले. त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेलांना १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पाडले होते.  त्यानंतर ओबीसीच्या मुद्द्यावर त्यांनी आंदोलन उभारले. मात्र, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतानाही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या. ओबीसीला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी खासदारकीला लाथ मारत राजीनामा दिला. ते एक उत्तम शेतकरी नेता आणि ओबीसी नेता म्हणून उदयास आले होते. त्यानंतर त्यांनी परत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. 

दरम्यान, २०१९ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले. ते चांगल्या मतांनी निवडूनही आले. २०१९ च्या सत्तानाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. आजपर्यंत राज्यात एकाही विधानसभा अध्यक्षपदी असलेल्या नेत्यांची चर्चा झाली नव्हती. मात्र, नानांनी हे पद चर्चेत आणले. त्यानंतर आता त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद म्हणून नियुक्ती झाली.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com