esakal | सोनिया गांधी म्हणाल्या, 'हे' दोन्ही चव्हाण मंत्रिमंडळात नको! 
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi

राज्यात भाजपला बाजूला सारून सत्तास्थापनेच्या घडामोडी होत असताना सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरुन पाठिंबा द्यावा, असा काँग्रेस पक्षश्रेष्ठांचा आग्रह होता. मात्र, काँग्रेस आमदारांचा सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत आग्रह होता.

सोनिया गांधी म्हणाल्या, 'हे' दोन्ही चव्हाण मंत्रिमंडळात नको! 

sakal_logo
By
राजू सोनवणे

मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्य मंत्रीमंडळात समावेशास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोध दर्शवला असल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात भाजपला बाजूला सारून सत्तास्थापनेच्या घडामोडी होत असताना सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरुन पाठिंबा द्यावा, असा काँग्रेस पक्षश्रेष्ठांचा आग्रह होता. मात्र, काँग्रेस आमदारांचा सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत आग्रह होता. तो मान्य करुन नंतर बाळासाहेब थोरात व नितिन राऊत या दोन काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. आता लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.

...म्हणून प्रज्ञासिंह ठाकूर यांची स्पाईसजेटविरोधात तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण या काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी काम करू नये यासाठी सोनिया गांधी आग्रही असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी दोनही माजी मुख्यमंत्री इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. सोनिया गांधी यांची मनधरणी करण्यासाठी दोन दिवसांपासून अशोक चव्हाण दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर आज बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण  दिल्लीला जाणार आहेत. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळातील समावेशावर निर्णय होणार आहे. 

सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार