आरे मेट्रो कारशेडला विरोध दर्शवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचं आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरे मेट्रो कारशेडला विरोध दर्शवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचं आंदोलन

आरे मेट्रो कारशेडला विरोध दर्शवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या घरावर काँग्रेसचं आंदोलन

मुंबईतील आरे जंगलात सुरु असलेले मेट्रो कारशेडचे काम थांबवण्यासाठी पर्यावरण प्रेमींसह आता राजकीय पक्षही मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आरे मेट्रो कारशेडला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

तर यावेळी पर्यावरणप्रेमींसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी जमण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सत्ता बदलानंतर शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या कामकवरील बंदी हटवली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती.

या मेट्रो कारशेडमुळे अनेक झाडे तोडली जातील, पर्यावरणाला धोका निर्माण होईल त्यामुळे पर्यावरण प्रेमी याला विरोध करत आहेत.

Web Title: Congress Protest On Cm Eknath Shinde Thane House Against Aarey Metro Carshed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..